महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील नामांकित शैक्षणिक संस्थेकडून सर्व शैक्षणिक 'इमारती क्वारंटाईन वार्ड'मध्ये रुपांतरित करण्याची ‌ऑफर - D A V

कोरोना विषाणूविरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहकार्याच्या भावनेने, देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या 'डीएव्ही' संस्थेने देशातील त्यांच्या शैक्षणिक इमारतींचे क्वारंटाईन वार्डमध्ये रुपांतर करण्याची ‌ऑफर दिली आहे.

डीएव्ही शैक्षणिक संस्था
डीएव्ही शैक्षणिक संस्था

By

Published : Apr 8, 2020, 11:35 AM IST

हिस्सार (हरियाणा -कोरोना विषाणूविरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहकार्याच्या भावनेने, देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या डीएव्ही संस्थेने देशातील त्यांच्या शैक्षणिक इमारतींचे क्वारंटाईन वार्डमध्ये रुपांतर करण्याची ‌ऑफर दिली आहे. डीएव्ही संस्थेमार्फत देशभरात शाळा व महाविद्यालये चालवली जात असून प्रत्येक जिल्हा स्तरावर संस्थेच्या शैक्षणिक इमारती आहेत.

डीएव्ही संस्थेकडून सर्व शैक्षणिक 'इमारती क्वारंटाईन वार्ड'मध्ये रुपांतरीत करण्याची ‌ऑफर

हेही वाचा...'मरकझ'ला गेल्याचे लपवल्यामुळे सहा विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल..

डीएवीकडूनच क्वारंटाईन वॉर्डचा खर्च केला जाणार

ज्याप्रमाणे डीएव्ही संस्था त्यांच्या सर्व इमारती क्वारंटाईन वॉर्डसाठी देणार आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे त्या सर्व इमारतींच्या क्वारंटाईन वॉर्डात ठेवण्यात जाणाऱ्या लोकांचा खर्चही संस्था उचलत आहे. यासाठी संस्थेने पंतप्रधान 'केअर फंड'मध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम पाठवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details