इटावा -उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील वनविभागाच्या एका अधिकाऱ्याच्या दोन मुलींनी गरिबांसाठी मास्क बनवण्याचे काम सुरू केले आहे. या दोघी बहिणी घरच्या घरी शेकडो मास्क तयार करून ते गरिबांना निःशुल्क वाटप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेले भाषणातून आणि आपल्या आईवडिलांकडून हे काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले आहे.
वनअधिकाऱ्याच्या मुलींनी जपले सामाजिक भान; मास्क बनवून शेकडो गरिबांना निःशुल्क वाटप - इटावा में मास्क का नि:शुल्क वितरण
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. याचा गरीब आणि हातावरचे पोट असलेल्या जनतेला मोठा फटका बसत आहे. त्यांच्या मदतीसाठी काही करण्याची इच्छा होती. या भयंकर महामारीच्या काळात देशातील गरीब नागरिकांची सुरक्षाही आवश्यक आहे.
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. याचा गरीब आणि हातावरचे पोट असलेल्या जनतेला मोठा फटका बसत आहे. त्यांच्या मदतीसाठी काही करण्याची इच्छा होती. सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे आवश्यक आहे. याबाबत गोरगरिबांमध्ये जागृती करणे आणि त्यांना निःशुल्क मास्क उपलब्ध करून देणे हे दोन्ही उद्देश यातून साध्य होत आहेत असे त्या म्हणाल्या. या भयंकर महामारीच्या काळात देशातील गरीब नागरिकांची सुरक्षाही आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी आणि आपले आई-वडील यांच्याकडून आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचे दीपशिखा यांनी सांगितले.
हे मास्क सुती कापडापासून बनवलेले असून ते धूवून आणि सॅनिटाईज करून पुन्हा-पुन्हा वापरता येतात. तसेच, मास्क खराब झाल्यास त्याची सहजपणे विल्हेवाट लावता येते. यामध्ये हानिकारक काहीही नाही. कारण, हे मास्क घरच्या घरी बनवण्यात आले आहेत.