महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊनचा फटका..! आईच्या पार्थिवाला मुलींना द्यावा लागला खांदा... उत्तर प्रदेशातील घटना - लॉकडाऊन

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे उत्तर प्रदेश राज्यातील बालियामधील दोन बहिणींना मृत आईच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला.

UP: Daughters carry mother's dead body on shoulder amid lockdown
लॉकडाऊनमुळे आईच्या पार्थिवाला मुलींना दिला खांदा...उत्तर प्रदेशातील घटना

By

Published : Mar 30, 2020, 3:10 PM IST

बालिया(उत्तर प्रदेश)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील बालिया येथील दोन बहिणींना आईचे पार्थिव नेण्यासाठी खांदा द्यावा लागला. लॉकडाऊन असल्याने अत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाण्यासाठी त्यांना कोणतेच वाहन मिळाले नाही.

लॉकाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने त्यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक देखील येऊ शकले नाहीत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग असल्याने शेजारी देखील अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत.

आमच्या वडिलांचे निधन यापूर्वीच झालेले आहे. आम्ही चार बहिणी असून त्यापैकी दोघी दुसऱ्या शहरात राहतात. चुलतभाऊ पाटणा येथे राहतो पण लॉकडाऊन असल्याने तो अंत्यसस्काराला येऊ शकला नाही. त्यामुळे आमच्या समोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आईच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला, असे आशा सोनी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details