नवी दिल्ली -राजधानीमधील नोयडा येथे बिर्याणी विकणाऱ्या एका दलित युवकाला काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी 3 युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली : बिर्याणी विकणाऱ्या दलित युवकाला मारहाण, दिल्या जातीवाचक शिव्या - रबुपूरा
राजधानीमधील नोयडा येथे बिर्याणी विकणाऱ्या एका दलित युवकाला काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
रबुपूरा येथील अंबेडकरनगरमध्ये राहणारा युवक यमुना एक्सप्रेस-वे येथे व्हेज बिर्याणी विकत होता. त्यावेळी काही युवकांसोबत त्याचा वाद झाल्यावर युवकांनी त्याला मारहाण करत जातीवाचक शिव्या दिल्या. तसेच त्याला बिर्याणी विकण्यास मनाई केली.
पोलीस अधिक्षक रणविजय सिंह यांनी पीडित तरुणाची तक्रार दाखल करून घेतली आहे. खेडा मोहम्मद येथील 3 युवकांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपींना अटक करण्यासाठी एक पथक तयार केले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे सिंह यांनी सांगितले.