महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना विषाणूची महामारी आपल्यासाठी एक इशारा - दलाई लामा - Dalai Lama message on corona

वुहान शहरात कोरोना वायरस पसरत असल्याची माहिती मिळताच मी चीन आणि दुसऱ्या देशातील माझ्या बांधवांसाठी प्रार्थना सुरू केली आहे. या विषाणूपासून कोणीही सुरक्षित नाही. आपण सर्व आपल्या नातलंगाच्या काळजीसह भविष्यातील आर्थिक समस्येवरून चिंतेत आहोत. ही महामारी एक आपणासाठी चेतावणी आहे. जी आम्हाला एक प्रकारची शिकवण देत आहे, की आपण या महामारीचा सामूहितरित्या सामना करू शकतो.

कोरोना विषाणूची महामारी आपल्यासाठी एक इशारा आहे - दलाई लामा
कोरोना विषाणूची महामारी आपल्यासाठी एक इशारा आहे - दलाई लामा

By

Published : Apr 15, 2020, 6:01 PM IST

धर्मशाला - कोरोना विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी अशा महामारीमध्ये केवळ प्रार्थना करणे उचित नाही, तर आपल्या जबाबदारीचे पालन करणेही गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.

कोरोनासारखी महामारी आपणास शिकवण देत आहे, की आपण वेगवेगळे राहिलो तरी आपण विभक्त नाही. त्यामुळे आपण सर्वांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक युद्धे आणि भयानक संकटांना नष्ट होताना पाहिले आहे, त्याचप्रमाणे कोरोनाचेही हे संकट देखील लवकरच नष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा म्हणाले, माझे मित्र मला माझ्याकडील चमत्कारी शक्तींचा वापर करून हा आजार दूर करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, मी त्यांना नेहमी सांगतो, की माझ्याकडे कोणत्याच चमत्कारी शक्ती नाहीत. माझ्याकडे जर जादू असती तर माझ्या पाय दुखले नसते किंवा माझा घसाही खवखव केला नसता, आपण सगळे एखसारखे आहोत. आपण सगळेच भीती, आशा आणि अनिश्चितता यासारख्या गोष्टींना जाणून घेतो. तसेच बौद्ध तत्वज्ञानासुसार प्रत्येक सजीव दुः ख, रोग, आजारपण आणि मृत्यू या सत्याबाबत परिचित आहे. मनुष्य जीवनात आपणास आपली बुद्धी-विवेक यामुळे राग लोभ, भीती यापासून मुक्त होण्याची क्षमता असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

दलाई लामा पुढे म्हणाले, भावनात्मक निशस्त्रीकरणावर मी सध्या भर देत आहे. ज्या माध्यमातून मानव आपल्या भावना, भीती आणि राग यावर नियंत्रण मिळवू शकेल. एखाद्या समस्येच निराकरण झाल्यास ती उपायोजना शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातूनही समाधान नाही झाल्यास त्याविषयी जास्त विचार करत बसून आपला वेळ वाया घालवला नाही पाहिजे, असाही सल्ला त्यांनी नागरिकांना दिला आहे.

वुहान शहरात कोरोना वायरस पसरत असल्याची माहिती मिळताच मी चीन आणि दुसऱ्या देशातील माझ्या बांधवांसाठी प्रार्थना सुरू केली आहे. या विषाणूपासून कोणीही सुरक्षित नाही. आपण सर्व आपल्या नातलंगाच्या काळजीसह भविष्यातील आर्थिक समस्येवरून चिंतेत आहोत. ही महामारी एक आपणासाठी चेतावणी आहे. जी आम्हाला एक प्रकारची शिकवण देत आहे, की आपण या महामारीचा सामूहितरित्या सामना करू शकतो. आपणास हे ही लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीची व्यक्ती व्याधीमुक्त नाही. त्यामुळे आपण अशा लोकांची मदत केली पाहिजे, ज्यांना घर नाही किंवा त्यांच्या उत्पन्नाची साधने नाहीत, त्यांचा कोणी नातलग नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details