छत्तीसगड लोकसभा निवडणूक : अजित जोगींची माघार, बसप सर्व जागा लढवणार
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि छत्तीसगड जनता काँग्रेसचे (सीजेसी) प्रमुख अजित जोगी यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी जोगी आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीपासून लांब ठेवण्याच्या विचारात आहेत. यामुळे छत्तीसगड लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत राहणार आहे.
३०० दहशतवादी मारले तर जगाला का दिसले नाही? सॅम पित्रोदांचा 'एअर स्ट्राईकवर' सवाल
काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय वायु सेनेने हवाई हल्ल्यामध्ये ३०० दहशतवाद्यांना मारले हे अत्यंत स्तुत्य आहे. मात्र, आकड्यांवर आपल्याकडे काही पुरावे आहेत का? भारतीय सेनेने पाकिस्तानला किती प्रमाणात नेस्तनाभूत केले याची माहिती घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असे थेट प्रश्न पित्रोदा यांनी केला आहे. त्यानंतर मात्र देशातील राजकारण तापले. वाचा सविस्तर
काँग्रेसवर 'सर्जिकल स्ट्राईक' करा; पित्रोदांच्या प्रश्नानंतर भाजपचे जनतेला आवाहन
काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपनेही प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षांनी भारतीय वायु दलाचा पुन्हा अपमान केला आहे. भारतीयांनो त्यांच्या अशा वक्तव्यावर आपण त्यांना प्रश्न विचारा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. निवडणुकांमध्ये तुमच्या मतदानाच्या शक्तिने काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करा, अशा शब्दात अमित शाह यांनी जनतेला आवाहन केले आहे. वाचा सविस्तर