महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त सपना चौधरीने फेटाळले; अखिलेश यादव आजमगडमधून लढणार - Matakandan

लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पक्ष संपूर्ण ताकदीनीशी निवडणुकीची तयारी करत आहेत. आज दिवसभरात राष्ट्रीय राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांचा धावता आढावा...

मतकंदन

By

Published : Mar 24, 2019, 9:20 AM IST

Updated : Mar 24, 2019, 6:11 PM IST

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या खोट्या, सपना चौधरीचे स्पष्टीकरण

मागील अनेक दिवसांपासून प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा होती. मात्र, आज त्यांनी सर्वच वृत्त फेटाळून लावले आहेत. सपना चौधरी मथुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तसेच भाजप उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेत्या हेमामालिनी यांना टक्कर देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. वाचा सविस्तर

अखिलेश यादव आजमगड येथून लढणार निवडणूक; स्टार प्रचारकातून मुलायम सिंहांचे नाव गायब

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार, हा तिढा शेवटी सुटला आहे. अखिलेश यावेळी आजमगड येथून निवडणूक लढवतील. मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचे वडिल मुलायम सिंह यादव यांनी येथूनच विजय मिळवला होता. समाजवादी पक्षाने आज आपल्या स्टार प्रचारकांचीही यादी जाहीर केली आहे. वाचा सविस्तर..

भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

भाजपमधील बंडखोर नेते आणि सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पाटणा साहिब या मतदार संघातून भाजपच्या तिकिटीवर निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या कार्यपद्धतीवर ते पूर्वीपासूनच सडकून प्रहार करत आले आहेत. तर, भाजपनेही सिन्हांना उमेदवारी देणे टाळले आहे. वाचा सविस्तर..


लोकसभा २०१९: काँग्रेसची ८ वी यादी जाहीर, अशोक चव्हाण नांदेडमधून लढणार


एम वीराप्पा मोईली यांना कर्नाटकातील चिक्काबल्लापूर, हरिष रावत उत्तराखंड येथील नैनीताल-उधमसिंहनगर, मीनाक्षी नटराजन मध्यप्रदेशातील मंदसौर, राशिद अल्वी उत्तर प्रदेशातील अमरोहा आणि मनीष खांदूरी यांना उत्तराखंड येथील गढवाल येथून उमेदवारी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर..


राहुल गांधींची संपत्ती ५५ लाखांवरून ९ कोटींवर गेली कशी - भाजप

राहुल यांची फिरकी घेतानाच रविशंकर यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'आम्ही विकासाचे 'वाड्रा मॉडेल' पाहिले आहे. केवळ ६ ते ७ लाख रुपयांची गुंतवणूक करा आणि ७०० ते ८०० कोटींचे मालक व्हा. आता विकासाचे 'राहुल मॉडेल' पाहात आहोत,' त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर..


केंद्रीय मंत्री उमा भारती लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत; पक्षात काम करण्याची ईच्छा

'उमा भारती यांनी या वेळी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून याबाबत कळविले होते. त्या पक्षासाठी कार्य करू इच्छित होत्या. पक्षाने त्यांची विनंती मान्य केली,' असे नड्डा यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर..

पुलवामा हल्ल्यावेळी 'बीफ बिर्याणी' खाऊन झोपला होतात का, ओवेसींचा मोदींवर हल्ला

'तुम्हाला बालाकोटमध्ये ३०० मोबाईल सुरू असलेले समजतात. मग, तुमच्या नाकाखाली कोणीतरी ५० किलो आरडीएक्स पुलवामामध्ये घेऊन आल्याचे कसे समजले नाही? पुलवामा हल्ल्यावेळी'बीफ बिर्याणी' खाऊन झोपला होतात का,' असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे. वाचा सविस्तर..

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार तामिळनाडूतील १११ शेतकरी

आपल्या मागण्यांसाठी दिल्लीमध्ये अनेक दिवस आंदोलन केलेले तामिळनाडूचे शेतकरी आता पंतप्रधान मोदींविरोधातच वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोदींविरोधात हे शेतकरी वाराणसी मतदारसंघातून १११ नामांकने दाखल करणार आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी दिली. वाचा सविस्तर..


भाजपची लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; ४६ उमेदवारांचा समावेश

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची पाचवी यादी जाहीर केली आहे. महासचिव जे.पी.नड्डा यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या यादीत ४६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये झारखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधील उमेदवारांचा समावेश आहे. वाचा सविस्तर..

'पंतप्रधान मोदी खोटे बोलतात, ममतांच्या काळात 'सीपीएम'सारखाच अत्याचार होतोय'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शनिवारी पश्चिम बंगालच्या मालदा येथे जाहीर सभा झाली. यावेळी राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. मोदींनी कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच एकीकडे मोदी खोटे बोलतात तर दुसरीकडे ममता बॅनर्जी खोटी आश्वासने देतात, अशा शब्दात राहुल यांनी मोदी आणि ममतांवर टीका केली. वाचा सविस्तर..

Last Updated : Mar 24, 2019, 6:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details