नवी दिल्ली -भारतीय वायूदलाने ८३ तेजस लढाऊ विमान मिळणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) च्या पहिल्या बैठकीत विमानाच्या अधिग्रहणाला मान्यता देण्यात आली आहे.
डीआरडीओची एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीसह(एडीए) तेजसच्या नौदल विविध आवृत्ती विकसित करत आहे. आयएएफने हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) 40 तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. 2018 मध्ये, एएएफने आणखी 83 तेजस विमानांची मागणी केली होती. या विमानांची किंमत 50,000 कोटी असणार आहे. या विमानांमध्ये अत्याधुनिक हवाई उपकरणे आणि रडारचा समावेश असेल.