बंगळुरू -जागतिक महिला दिनाच्या पर्वावर भारतीय रेल्वेच्या पोलीस विभागाला प्रथम महिला अधिकारी मिळाली आहे. डी. रूपा असे या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना कर्नाटक येथे रेल्वेच्या पोलीस महानिरीक्षकाचा पदभार सोपवण्यात आला आहे. या पदावर नियुक्त होताच त्यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती दिली. तसेच रेल्वेमध्ये प्रवास करताना कोणतीही अप्रिय घटना घटल्यास मदत मागण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
डी. रूपा कर्नाटक कॅडरमधील २००० बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. कर्नाटकच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे वडील जे. एच. दिवाकर सेवानिवृत्त अभियंता आहेत. रूपा यांनी मनोविज्ञान शास्त्रात स्नातकोत्तर पर्यंतचे शिक्षण कुवेम्पू विद्यापीठातून पूर्ण केले. भरत नाट्यम् आणि हिंदूस्तानी शास्त्रीय संगितावरही त्यांचा चांगलाच पायंडा आहे.