महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 2, 2020, 7:16 PM IST

ETV Bharat / bharat

'निसर्ग' चक्रीवादळ उद्या अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

विषुवृत्तीय चक्रिवादळ 'निसर्ग' उद्या(बुधवार) 3 जूनला महाराष्ट्रातील अलिबागच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Cyclone Nisarga
'निसर्ग' चक्रीवादळ

नवी दिल्ली - विषुवृत्तीय चक्रीवादळ 'निसर्ग' उद्या(बुधवार) 3 जूनला महाराष्ट्रातील अलिबागच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तेथून पुढे वादळ मुंबईच्या आणि गुजरातच्या दिशेने सरकणार असल्याच अंदाज वर्तवला आहे.

निसर्ग चक्रीवादळ उद्या अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

पुर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तरेकडील 14.4 अक्षवृत्त आणि 71.2 रेखावृत्तावर हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे ठिकाण पणजीपासून 300 कि.मी नैऋत्येकडे तर 550 किमी मुंबईपासून दुर आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप परिसर, केरळ किनारी भागात पुढील 48 तास मासेमारी न करण्याच्या सुचना हवामान विभागाने मच्छिमारांना दिल्या आहेत. तर 3 आणि 4 जूनला महाराष्ट्रातील किनारी भागातील मच्छिमारांना मासेमारी न करण्याचा इशारा दिला आहे.

रायगड प्रशासन सतर्क

एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली असून अजून दोन पथके दाखल होणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यात 144 कलम लागू केले असून नागरिकांनी 3 जून रोजी बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


जिल्ह्यात एनडीआरएफची 22 जणांची दोन पथके दाखल झाली आहेत. यापैकी एक अलिबाग तर, दुसरे श्रीवर्धन येथे तैनात आहे. तर एनडीआरएफ आणखी दोन पथके दाखल होणार आहेत. अलिबाग, श्रीवर्धन येथील एनडीआरएफ पथकाने आज समुद्रकिनारी भागात फिरून परिस्थितीची पाहणी केली. तसेच मुरुड कोस्ट गार्ड पथक, रिव्हर राफ्टिंग पथक यांनाही सतर्क करण्यात आले आहे. समुद्रकिनारी असलेल्या जीवरक्षक यांनाही सतर्क केले आहेत. जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगतच्या 62 गावांतील 1 लाख 73 हजार नागरिकांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details