Live Update
- ओडिशा : ओडिशात फनी चक्रीवादळाचा तडाका सुरूच आहे. दरम्यान राज्याच्या विविध ठिकाणी ५ जनांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. चक्रीवादळ थांबल्यानंतर या बातमीची संपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.
- ओडिशा: नायापल्ली येथे फनी वादळाच्या तडाख्याने अनके झाडे उन्मळून पडली आहेत. स्थानिक पोलिसांनी रस्त्यावर पडलेली ही झाडे हटवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच प्रदीप जिल्ह्यातील निवारगृहात लोकांना अन्न तसेच इतर साहित्य वाटप करण्यात येत आहे.
- भारतीय नौदलाच्या पी -8 आय विमान आणि डोर्नियरच्या मदतीने फनी वादळामुळे किनारीपट्टी भागात झालेल्या परिणामा चे सर्वक्षण करण्यात येणार आहे.
- पुढील तीन तासात फनी वादळाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेगही कमी होऊन १५०- १६० प्रतितास होण्याची शक्यता आहे. त्यांनतर हे वादळ उत्तर तसेच उत्तर-पूर्व ओडिशामार्गे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सांयकाळी आडिशाच्या उत्तर भागात फनीचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे दिल्ली येथील अधिकारी मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिली. तसेच आंध्र प्रदेशपासून हे वादळ दुर गेले असून या वादळाचा तीन जिल्ह्याला तडाखा बसला आहे.असेही मोहपात्रा यांनी सांगितले
- फनी वादळाच्या प्रभावामुळे ओडिशाच्या भाद्रक येथे प्रतिकूल समुदी हवामान.
- आंध्रप्रदेश: लोकांनी श्रीककुलम जिल्ह्यातील इचचपुरम शहरातील निवारा केंद्रात आश्रय घेतला आहे. श्रीककुलम जिल्ह्यात आज सकाळपासून वादळीवाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे बऱ्याच घरांचे नुकसान झाले आहे.
- ओडिशा: फनी वादळ पुरी किनारपट्टीला धडकल्यानंतर गंजम जिह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस. वाऱ्याचा वेग १७५ किमी प्रति तास.
- आंध्रप्रदेश: विशाखापट्टणममध्ये वायुदलाचे 13 विमान वादळ ग्रस्तांच्या मदतीसाठी आणि मदत साहित्या वितरण करण्यासाठी सज्ज.
- ओडिशातील पुरी येथे वाऱ्याचा वेग २४० ते २४५ प्रति तास असल्याची आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याची भारतीय हवामान खाते हैदराबाद यांची माहिती. ओडिशानंतर फॅनी वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार.
- फॅनी वादळ सकाळी ८ वाजता समुद्रातून जमिनीवर दाखल झाले असून (लँड फॉल) २ तास या वादळाचा प्रभाव राहील. त्यानंतर हे वादळ उत्तर तसेच उत्तर-पूर्व ओडिशामार्गे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्याता आहे. ओडिशातील किनार पट्टीवरील जिल्ह्यांना या वादळाचा तडाखा बसणार आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग ३५ किमी प्रति तास होता. अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे प्रदीप येथील अधिकारी आर. शुक्ला यांनी दिली.
- आंध्रप्रदेश: श्रीककुलम जिल्ह्याच्या कोट्टुरू मंडळ येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एनडीआरएफ) मदतकार्य सुरू.