महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाच्या संकटात पश्चिम बंगालला चक्रीवादळचा तडाखा...

अम्फान वादळामुळे राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारला गेल्या 250 वर्षांमध्ये आलेल्या भंयकर अशा वादळापैंकी एक असलेल्या अम्फानचा सामना करावा लागला. 1999 मध्ये सुपर चक्रीवादळाने ओडिशाचा नाश केला होता. अधिकृत आकडेवारीनुसार जखमींचे आकडे 9 हजार 887 होते. तर अनधिकृत आकडेवारी ही 30,000 होती.

चक्रीवादळ
अम्फान

By

Published : May 24, 2020, 9:16 AM IST

कोलकाता- देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यातच देशातील पश्चिम बंगाल राज्याला अम्फान च्रकीवादळाचा सामना करावा लागला. या वादळामुळे राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारला गेल्या 250 वर्षांमध्ये आलेल्या भंयकर अशा वादळापैंकी एक असलेल्या अम्फानचा सामना करावा लागला. 1999 मध्ये सुपर चक्रीवादळाने ओडिशाचा नाश केला होता. अधिकृत आकडेवारीनुसार जखमींचे आकडे 9 हजार 887 होते. तर अनधिकृत आकडेवारी ही 30,000 होती.

1999 पासून ते आजपर्यंत बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. चक्रीवादळाची सुचना देणारी यंत्रणा विकसीत झाली आहे. पण, 20 मे ला दुपारी जे घडले ते बहुतेकांच्या कल्पनांच्या पलीकडे नव्हते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा 250 वर आहे. या विषाणूमुळे 3 हजार 197 लोक प्रभावित झाले आहेत. इतर राज्यात कामासाठी गेलेले कामगार श्रमिक रेल्वे आणि बसेसने परतत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पीपीई कीट्स, डॉक्टर, परिचारिका यांची कमतरता आहे. यावरून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर वेळोवेळी निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या संकटातच चक्रीवादळ येऊन धडकले. मेदिनीपूर जिल्ह्यातील दिघा, शंकरपूर आणि ताजपूर किनारपट्टीवर जोरदार वारा वाहू लागला. ममता बॅनर्जी राज्य सचिवालय नबन्ना येथील केंद्रीय नियंत्रण कक्षामधून परिस्थितीवर लक्ष ठेऊन होत्या. २० मे ला दुपारी 2.30 वाजता भुस्ख्खलन झाल्याने डेल्टा प्रदेशातील समृद्ध जैवविविधता अक्षरश: पुसली गेली.

ग्रामीण दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बांध पत्त्यांप्रमामे कोसळले. 190 किलोमीटर ताशी वाऱ्याचा वेग होता. बुलबुल आणि फनी या दोन चक्रीवादळांच्या तुलनेने हे चक्रीवादळ तीव्र होते. जोरदार पावसाने कोलकाता विमानतळ पाण्याखाली गेले. कंट्रोल रूममधून बॅनर्जी यांचे परिस्थितीवर लक्ष होते. मात्र, निसर्गासमोर त्या हतबल होत्या.

चक्रीवादळामुळे 72 लोकांचा मुत्यू झाल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. आंबा, लिची, सुपारी, ताट, तीळ आणि इतर पिकांचे नुकसान झाले. चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालाचा दौरा केला. पश्चिम बंगालला 1 हजार कोटींची तत्काळ मदत त्यांनी जाहीर केली.

दरम्यान राज्यात कोरोना आणि अम्फाननंतर लोकांचे आयुष्य सुरळीत होईल का? चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे काय होईल? लॉकडाऊनमुळे राज्यात परतलेल्या हजारो प्रवासी मजुरांचे काय होईल? त्यांना पोटासाठी राज्यात काम मिळेल का? हे प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

हा लेख ईटीव्ही भारतचे वृत्त समन्वयक दिपंकर बोस यांनी लिहला आहे. पश्चिम बंगाल कोरोनावर मात करण्याच्या प्रयत्नात असतानाच राज्यावर कोसळलेले 'अम्फान' संकट आणि त्यानंतर राज्यात उद्भवलेली परिस्थिती, आशा विविध मुद्द्यांवर लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details