हैदराबाद- सायबराबाद पोलिसांनी गेल्यावर्षी ऑपरेशन स्माईल मोहिम राबवली होते. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी वर्षभरात ५८१ बालकामगारांची सुटका केली आहे.
ऑपरेशन स्माईल : तेलंगाणा पोलिसांकडून ५८१ बालकामगारांची सुटका - तस्करी
५८१ मुलांपैकी ५४३ जणांना (३३९ मुले आणि २०४ मुली) सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर, ३८ मुलांना (२९ मुले आणि ९ मुली) त्यांच्याकडे पालकांकडे सोपवण्यात आले आहे.
![ऑपरेशन स्माईल : तेलंगाणा पोलिसांकडून ५८१ बालकामगारांची सुटका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3589280-thumbnail-3x2-operationsmile.jpg)
सायबराबादच्या पोलीस आयुक्तांनी गेल्यावर्षी जून महिन्यात ऑपरेशन स्माईलसाठी ३ पथके स्थापन केली होती. ही पथके सायबराबादमधील वेगवेगळ्या भागात कार्यरत होती. लहान मुलांना भिक मागणे, लहान मुलांची तस्करी थांबवणे, वेश्या व्यवसायासाठी वापर होण्यापासून आणि गैरसामाजिक कृत्यासाठी त्यांचा वापर थांबवणे हा या मोहिमेचा मुळ उद्देश होता. ५८१ मुलांपैकी ५४३ जणांना (३३९ मुले आणि २०४ मुली) सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर, ३८ मुलांना (२९ मुले आणि ९ मुली) त्यांच्याकडे पालकांकडे सोपवण्यात आले आहे, अशी माहिती सायबराबादच्या पोलिसांनी दिली आहे.