महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एप्रिल फूल : कोरोनासंबंधित अफवा पसरवाल तर होणार कारवाई.. सायबर सेलची करडी नजर - दिल्ली पोलीस

एप्रिल फूलच्या नावावर कोरोना व्हायरसच्या संबंधित अफवा पसरविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधिताविरुद्ध दिल्ली पोलिसांचे सायबर पथक कारवाई करणार आहे. पोलिसांनी इशारा दिला आहे, की जर कोणी कोरोनाविषयी अफवा पसरविण्याचा प्रयत्न करताना दिसला तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल

cyber-crime-team-will-strictly-monitor
कोरोनासंबंधित अफवा पसरवाल तर होणार कारवाई

By

Published : Apr 1, 2020, 7:07 PM IST

नवी दिल्ली - जर कोणी एप्रिल फूलच्या नावावर कोरोना व्हायरसच्या संबंधित अफवा पसरविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधिताविरुद्ध दिल्ली पोलिसांचे सायबर पथक कारवाई करणार आहे. पोलिसांनी इशारा दिला आहे, की जर कोणी कोरोनाविषयी अफवा पसरविण्याचा प्रयत्न करताना दिसला तर त्याच्याविरुद्ध गुन्हादाखल केला जाईल


सोशल मीडियावर राहणार करडी नजर -

दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइमशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल फूलच्या नावावर अनेक लोक अफवा पसरविण्याचे काम करत असतात. सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचे संकट वाढत आहे. अशा परिस्थितीत सायबर क्राइम सेलचे पोलीस सोशल मीडिया हँडलवर लक्ष ठेऊन आहेत. अफवा पसरु नयेत म्हणून लोकांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर लोकांनी चुकीची पोस्ट शेअर करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई किंवा सहा महिन्यांचा तरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details