महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हल्दीरामवर सायबर हल्ला, 'हॅकर'ने मागितली 'इतकी' खंडणी - सायबर हल्ला बातमी

हल्दीराम कंपनीवर हॅकरने सायबर हल्ला करत माहिती डिलीट केली आहे. ही माहिती पाहिजे असेल तर साडेसात लाखांची खंडणीची मागणी त्या हॅकर्सनी केली आहे.

edited photo
संपादित छायाचित्र

By

Published : Oct 18, 2020, 9:56 AM IST

नोएडा (उत्तर प्रदेश)- येथील खाद्य कंपनी हल्दीराम वर सायबर हल्ला झाला आहे. सायबर हल्ला करणाऱ्या हॅकरने कंपनीच्या विपणनसह (मार्केटिंग) अनेक काही महत्वाची माहिती हल्दीरामच्या सर्व्हरमधून डिलीट केली आहे. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असून हॅकर्सने माहिती परत देण्यासाठी कंपनीकडे खंडणीची मागणी केली आहे.

'इतकी मागितली खंडणी'

चोरलेली माहिती परत देण्यासाठी हॅकर्सने सात ते साडेसात लाखांची खंडणी मागितली आहे. हा सायबर हल्ला 12 जुलैला रात्री झाला होता. त्यानंतर हल्दीराम कंपनी के आईटी विभागाकडून सेक्टर 58 च्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलीस तपास करत असून लवकरच आरोपीला गजाआड करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

हल्दीरामवर सायबर हल्ला


'असा' घडला प्रकार

नोएडाच्या सेक्टर 58 में हल्दीराम कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी कंपनीच्या आईटी विभागाचेही कामकाज चलते. कंपनीच्या आईटी विभाग डीजीएम अजीज खान यांनी सेक्टर 58 पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 12 जुलैला रात्री कार्यालयाच्या सर्व्हरवर वायरसने अटॅक केले. ज्यामध्ये मार्केटिंग विभागासह इतर विभागाचाही डाटा डिलीट झाला होता. त्याचबरोबर महत्वाच्या काही फाइलीही गायब झाल्या. कंपनीकडून प्रथम अंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिकारी व हॅकर्स यांच्यात चैट (संवाद) झाले. हॅकर्सनी डाटा परत देण्यासाठी साडे सात लाखांची मागणी केली.

'लवकरच होतील आरोपी गजाआड'

याबाबत अतिरिक्त पोलीस उपायुक्त रणविजय सिंह म्हणाले, कंपनीद्वारे डाटा हॅक झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणाचा तपास सायबर सेल करत आहे. ते म्हणाले, कंपनीच्या सर्व्हरवर रैनसमवेयर अटॅक झाला आहे. त्यानंतर मॅसेज करत हॅकरने कंपनीला पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल, असे आश्वासन रणविजय सिंह यांनी दिले आहे.

हेही वाचा -सात महिन्यानंतर 'तेजस' रुळावर, अहमदाबाद ते मुंबई प्रवासात मिळणार 'या' सुविधा

ABOUT THE AUTHOR

...view details