नवी दिल्ली- राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. आज (शनिवार) काँग्रेस कार्यकारीणीची बैठक झाली. काँग्रेस कार्यकारिणी आज संध्याकाळी ८.३० वाजता पुन्हा बैठक घेणार आहे. ९ वाजेपर्यंत नव्या अध्यक्षांचे नाव निश्चित करण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी दिली. आता बैठक संपल्याचे त्यांनी सांगितले.
सोनिया गांधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमधून बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आणि राहुल अध्यक्ष निवड करताना चर्चेत सहभाग घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.