महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सोन्याची बिस्किटे, दागिन्यांसह सुमारे ३ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल जप्त - Custom team caught gold of 1 crore

भारतीय सीमाशुल्क विभागाच्या तिरूपती विभागाच्या पथकाने आंध्र प्रदेशमध्ये ही कारवाई केली. सुमारे 3 कोटी 40 लाखांचा हा मुद्देमाल आहे.

gold
gold

By

Published : Dec 20, 2020, 12:32 PM IST

नवी दिल्ली/तिरूपती -दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याचे दागिने आणि विदेशातील सोन्याचे बिस्किटे जप्त करण्यात आले आहेत. भारतीय सीमाशुल्क विभागाच्या तिरूपती विभागाच्या पथकाने आंध्र प्रदेशमध्ये ही कारवाई केली. सुमारे 3 कोटी 40 लाखांचा हा मुद्देमाल आहे. तर 3 कोटींपेक्षा जास्त सोनेही जप्त केले आहे.

gold

टोल प्लाझाजवळ कारवाई

सीमाशुल्क विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या टोल प्लाझाजवळ 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 1 किलो 970 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. याची किंमत सुमारे १ कोटी आहे. त्याचवेळी 4 किलो 780 ग्रॅम वजनाचे विदेशी सोन्याची बिस्किटेही जप्त करण्यात आली आहेत. त्याची किंमत 2 कोटी 47 लाख सांगितली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details