महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

28 लाख रुपयांच्या विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्याला अटक - दिल्ली सीमा शुल्क विभाग

विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला दिल्ली सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे. त्याच्याकडून सौदी रियाल चलन जप्त केले आहे. त्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 28 लाख 80 हजार आहे.

विदेशी चलनाची तस्करी
विदेशी चलनाची तस्करी

By

Published : Nov 8, 2020, 12:24 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर दिल्ली सीमा शुल्क विभागाने विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला अटक केली आहे. हा प्रवासी दुबईला जात होता. त्याच्याकडून सौदी रियाल चलन जप्त केले आहे. त्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 28 लाख 80 हजार आहे. यापूर्वीही या व्यक्तीने 35 लाखांपेक्षा जास्त विदेशी चलनाची तस्करी केली होती.

दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर विदेशी चलनाची तस्करी

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. कलम 104 अंतर्गत त्याला अटक करण्यात आली. तर कलम 110 अंतर्गत त्याच्याकडून विदेशी चलन जप्त केले. यापूर्वीही अशा घटना इंदिरा गांधी विमानतळावर घडल्या आहेत.

तस्करीचं अनोखं प्रकरण

यापूर्वी इंदिरा गांधी विमानतळावर परदेशी चलनाच्या तस्करीचे एक अनोखे प्रकरण समोर आले होते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) फेब्रुवरी महिन्यात एका प्रवाशाला परदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी अटक केली. प्रवाशाने चक्क भुईमुगाच्या शेंगा, बिस्किट पॅकेट आणि मटणाच्या तुकड्याच्या आतमध्ये युरो, रियाल आणि दीनार यासारखे परदेशी चलन लपवून आणले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details