नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर देशात मंदीचे सावट आहे. मात्र, यातच अमली पदार्थांचा व्यवस्याय तेजीत सूर असल्याचे समोर आले आहे. आज दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर सीमा शुल्क विभागाने 10 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. काबूलमधून आलेल्या 2 जणांकडून हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
आयजीआय विमानतळावर सीमा शुल्क विभागाकडून 10 कोटींचे ड्रग्स जप्त - Delhi Custom caught drugs at IGI Airpor
दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर सीमा शुल्क विभागाने 10 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. काबूलमधून आलेल्या 2 जणांकडून हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
![आयजीआय विमानतळावर सीमा शुल्क विभागाकडून 10 कोटींचे ड्रग्स जप्त ड्रग्स](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9182679-817-9182679-1602750639666.jpg)
ड्रग्स
काबूलमधून आलेल्या 2 अफगाण प्रवाशांकडून सिमा शुल्क विभागाने 4 किलो 790 ग्राम ड्रग्स जप्त केले आहेत. याची किंमत 10 कोटी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांनाही सीमा शुल्क विभागाने अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
गुजरातमधील कच्छ येथे तटरक्षक दलांनी गेल्या वर्षांत पाकिस्तानी बोटीला पकडले होते. या बोटीतून ड्रग्सची 194 पाकीटे जप्त करण्यात आली होती. याची किंमत सुमारे 500 कोटी रुपये होती.