नवी दिल्ली -अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास तयार केलेले बोईंग कंपनीचे विमान आज भारतात दाखल झाले आहे. अमेरिकेतील टेक्सास प्रातांमधून १५ तासांच्या प्रवासानंतर हे विमान भारतात उतरले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या प्रवासासाठी हे विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात आले आहेत. यातील बदलांसाठी विमान अमेरिकेला नेण्यात आले होते.
ऑगस्ट महिन्यातच बोईंग कंपनी विमान भारताच्या ताब्यात देणार होती. मात्र, कोरोनाच्या प्रसारामुळे दिरंगाई झाली. एअर इंडियाच्या ताफ्यातील या विमानात बदल करण्यासाठी त्यांना अमेरिकेत बोईंग कंपनीच्या फॅसिलिट सेंटरमध्ये नेण्यात आले होते. सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बोईंग ७४७ या विमानाने प्रवास करतात. मात्र, त्यात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे.