शिलाँग- 'खासी स्टुडंन्ट युनियन'च्या सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर मेघालयातील सहा जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी सायंकाळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बिगर आदावासींबरोबर पूर्वेकडील खासी हिल्स भागातील इच्छामाटी येथे झालेल्या वादानंतर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध आणि 'इनर लाईन परमिट' लागू करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात एका सदस्याचा मृत्यू झाला.
केएसयू सदस्याच्या मृत्यूनंतर मेघालयातील ६ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी; इंटरनेटही बंद - caa Violence
या घटनेनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्था ढासळल्याने सहा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
या घटनेनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्था ढासळल्याने सहा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक मेघालयाचे गृहसचिव सी. व्ही. डी. डेंईंगडोह यांनी जारी केले आहे. ईस्ट जैतिया हिल्स, वेस्ट जैतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, राय भोई, वेस्ट खासी हिल्स आणि साऊथ खासी हिल्स या जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्याबरोबरच मेसेजिंग सेवेवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दिवसाला फक्त ५ संदेश पाठवता येणार आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याची मागणी स्टुडन्ट युनियनची होती, यासोबच इतरही मागण्या सदस्यांनी केल्या होत्या. मात्र, यावेळी हिंसाचार पसरला. काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हिंसाचारानंतर परिसरामध्ये तणाव निर्माण झाला आहे.