नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारात सहभाग असलेल्या प्रत्येकाला शिक्षा देण्यात येणार असून तो कोणत्याही पक्षाचा किंवा धर्माचा आहे, याचा विचार केला जाणार नाही, असे आज गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तसेच शाह यांनी सीएए, एनपीआर आणि न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीवरही भाष्य केले.
दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत तब्बल 700 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगल पेटवणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी मतदान कार्ड आणि चालक परवान्याचा वापर करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी 40 पेक्षा अधिक दल स्थापन केले असून ते रात्रं-दिवस काम करत असल्याचे शाह यांनी सांगितले.