महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CSIR-NAL ने तयार केला कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नॉन-इन्व्हेंसिव्ह व्हेंटिलेटर 'स्वास्थवायू' - सीएसआयआर एनएएल

सीएसआयआर - नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल), बंगळुरूने कोरोनाच्या रूग्णांवरील उपचाराकरता एक नॉन-इन्व्हेंसिव्ह बाईपीएपी व्हेंटिलेटर विकसीत केला आहे. या व्हेंटिलेटरचे नाव 'स्वास्थवायू' असे ठेवण्यात आले आहे. या मशीनचा वापर करताना कोण्याही खास नर्गिंगची गरज नसून हा कोरोना रुग्णांच्या उपचाराकरता प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

CSIR-NAL develops Non-Invasive Ventilator to treat COVID-19 patients
CSIR-NAL develops Non-Invasive Ventilator to treat COVID-19 patients

By

Published : May 12, 2020, 12:43 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत चाललेल्या रुग्णांवरील उपचाराकरता बंगळूरुस्थित सीएसआरच्या नॅशनल अ‌ॅरोस्पेस लेबॉरेटीजमध्ये (एनएएल) अवघ्या ३६ दिवसांमध्ये एक नॉन-इन्व्हेंसिव्ह बाईपीएपी व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहे. या श्वसनोपयोगी उपकरणाला त्यांनी 'स्वास्थवायू' असे नाव दिले आहे.

सीएसआयआर एनएएल टीमने एरोस्पेस डिझाइन डोमेनमधील कौशल्याच्या आधारे स्पिन-ऑफ तंत्रज्ञान विकसीत केले आहे. याकरता एनएएलच्या स्वास्थ केंद्रामध्ये बायोमेडिकल चाचण्या आणि बीटा क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या, असल्याचे सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे बोलताना म्हणाले.

सीएसआयआर-एनएएलचे संचालक जितेंद्र जाधव म्हणाले, या नॉन-इन्व्हेंसिव्ह व्हेंटिलेटरचा उपयोग कोरोनाच्या मध्यम किंवा गंभीर रुग्णांवरील उपचाराकरता अगदी योग्यपणे काम करते. ज्या रुग्णांना इन्ट्यूबेशन आणि इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनची गरज नसते अशा रुग्णांसाठी या नॉन-इन्व्हेंसिव्ह व्हेंटिलेटर हे उपायकारक ठरु शकते.

भारत आणि विदेशातील पल्मोनोलॉजिस्टच्या विशिष्ट माहितीच्या आधारे सीएसआयआर-एनएएलने हे बीआयपीएपी नॉन-इन्व्हेंसिव्ह व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहे. या उपकरणाला ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या माध्यमातून कोरोनाच्या विविध रुग्णांवर तसेच गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवरही उपचार करता येतो असे ते म्हणाले.

हा व्हेंटिलेटरला टेस्टींग अ‌ॅन्ड कॅलिब्रेशन लेबॉरेटरिजमार्फत (एनएबीएल) योग्य चाचण्या करून राष्ट्रीय सुरक्षा मान्यता मंडळामार्फत या व्हेंटिलेटरला सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, या मशीनला वापरताना कोणत्याही खास नर्सिंगची आवश्यकता नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या मशीनला सध्याची परिस्थिती बघता लहानमोठे रुग्णालय, घरातच राहुन उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांवरील उपचाराकरता ही मशीन अत्यंत उपयुक्त आहे. या व्हेंटिलेटरला स्वदेशी घटकांसह, वाजवी किंमतीत तयार करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. यासोबतच यामध्ये, ऑक्सिजनचे संयोजक युनिट, ऑटो बीआयपीएपी मोडसह सीपीएपी, टाईम्ड यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी जोडण्यात आल्या आहेत.

बीआयपीएपी नॉन-इन्व्हेंसिव्ह व्हेंटिलेटर हे एचईपीए फिल्टर (हायली एफिशिएंट पार्टिक्युलेट एअर फिल्टर) सह बिल्ट-इन बायो कॉम्पॅम्पिलिटी "3 डी प्रिंटेड मॅनिफोल्ड आणि कपलर" असलेल्या मायक्रो कंट्रोलर-आधारित असलेले अचूक क्लोज-लूप अडॅप्टिव कंट्रोल सिस्टम आहे. सीएसआयआर-एनएएल सध्या या मशीनला नियामक अधिकाऱ्यांकडून अधिकारिकरित्या मंजुरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या मशीनच्या उत्पादनासाठी त्यांनी आधीच काही खासगी उद्योग क्षेत्रातील कंपन्यांशी संपर्क साधला असून परवानगी मिळताच याच्या उत्पादनाला लगेच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(एएनआय वृत्त)

ABOUT THE AUTHOR

...view details