नवी दिल्ली - देशभरात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. 600 पेक्षा जास्त रूग्ण संपूर्ण देशभरात आढळून आले आहेत. या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी अनेकजण विविध मार्गाने मदतीचा हात पुढे करत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाने आपला एक दिवसाचा पगार देऊ केला आहे.
कोरोना : CRPF जवानांनी दिला एक दिवसाचा पगार; 33 कोटी 80 लाखांची मदत - CRPF जवानांनी दिला एक दिवसाचा पगार न्यूज
ही मदत पोलीस दलाच्या सर्व जवानांनी स्वेच्छेने देऊ केली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये तब्बल 32 कोटी 80 लाखाचा धनादेश जमा करण्यात आला आहे. कोरोनावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही ही मदत दिली असल्याचे या जवानांनी म्हटले आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल
ही मदत पोलीस दलाच्या सर्व जवानांनी स्वेच्छेने देऊ केली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये तब्बल 32 कोटी 80 लाखाचा धनादेश जमा करण्यात आला आहे. कोरोनावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही ही मदत दिली असल्याचे या जवानांनी म्हटले आहे.
खासगी क्षेत्रांतील अनेक कंपन्यांमधूनही कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी रिलायन्स उद्योगसमुहाने 5 कोटी महाराष्ट्राच्या मुख्यंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत देऊ केली आहे.