श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी अतिरेक्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) सहायक उपनिरीक्षक जखमी झाले. दहशतवाद्यांनी त्राल येथे सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड बॉम्ब फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.
'ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचे सहायक उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या भागात शोध मोहीम सुरू असून परिसराला वेढण्यात आले आहे.' अशी माहिती पोलिसांनी दिली.
काश्मीरच्या त्राल येथे ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफ अधिकारी जखमी हेही वाचा -दिल्लीकरांसाठी कोरोनामुळे यावर्षीचा हिवाळा अत्यंत धोकादायक
भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात काश्मीर खोऱ्यात चकमकी सुरूच आहेत. आतापर्यंत अनेक छुपे हल्ले झाले असून सैन्याने देशाच्या शत्रूंचे दात त्यांच्या घशात घातले आहेत. अनेक दहशतवादी संघटना सैन्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. सैन्याकडून या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
हेही वाचा -जेसीसी पक्षाला मोठा झटका; अमित जोगी, रिचा जोगी यांचा उमेदवारी अर्ज अवैध