नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षात सीआरपीएफने तब्बल २१५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर रियाझ नाईकू याचाही समावेश होता, अशी माहिती सीआरपीएफचे पोलीस महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी गुरुवारी दिली.
सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सच्या (सीआरपीएफ) गेल्या वर्षातील कामगिरीबाबत माहेश्वरी माहिती देत होते. यावेळी त्यांनी सांगितले, की २०२०मध्ये सीआरपीएफने नक्षलग्रस्त भागातील ३२ माओवाद्यांना ठार केले. तसेच, ५६९ माओवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय, ३४० नक्षलवादी सीआरपीएफला शरणही आले आहेत. यासोबत, 'कोब्रा' फोर्सेसनी सात माओवाद्यांना ठार केले होते, तर सुमारे ३०० आयईडी जप्त केले होते.
कोब्रामध्ये आता महिलांनाही प्रवेश?