महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 5, 2020, 12:33 PM IST

ETV Bharat / bharat

पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्याजवळ स्फोट, एक सैनिक जखमी

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवान हा 182 बटालियनमधील आहे.

पुलवामा
पुलवामा

श्रीनगर - जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला आहे. ही माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली.

आयडीडी स्फोट व गोळीबार करून दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकाला लक्ष्य केले. पहाटे 7.40 च्या सुमारास दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्याना लक्ष्य केले. गस्ती पथकाला लक्ष्य करण्यासाठी रस्त्याच्या कडेला आयईडी स्फोटके बसविण्यात आली होती. या स्फोटात एक सीआरपीएफ 182 बटालियन जवान जखमी झाला.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, संपूर्ण परिसराला घेराव घातला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

या आठवड्यात सीआरपीएफवरचा हा दुसरा हल्ला आहे. तत्पूर्वी, 1 जूनला उत्तर काश्मीरच्या सोपोर शहरात झालेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान आणि 65 वर्षीय नागरिक ठार झाले होते. दहशतवादी हल्ल्यादरम्यान जम्मू-काश्मीर पोलिसांनी तीन वर्षांच्या मुलाला गोळ्यापासून वाचवले.

ABOUT THE AUTHOR

...view details