मध्य प्रदेश- येथील दमोह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील परिस्थिती बिकट झाली आहे. येथील मडियाडो गावातल्या तीनशेहून अधिक शालेय मुलांचा जीव धोक्यात घालून शालेय कर्मचाऱ्यांनी ओसांडून वाहणारा पुल पार केला. सुदैवाने यात कोणताही अपघात झाला नाही.
शाळकरी मुलांचा जीव घातला धोक्यात; दमोह येथे ओसांडून वाहणारा पुल केला पार - Crossing the bridges student damoh
पावसातच मुले येथील शासकीय हायस्कूलमध्ये पोचली होती. परंतु, नंतर मुसळधार पावसाने हळूहळू शाळेतही पाणी शिरले. पाण्याने संपूर्ण शाळा भरुन गेली.मुसळधार पावसामुळे शाळेच्या आत पाणी शिरल्याने मुलांना उभे राहण्यास ही जागा राहिली नाही. त्यामुळे शालेय कर्मचाऱ्यांनी या मुलांना एक-एक करुन रांगेत उभे करुन, एकमेकांना धरुन येथील ओसांडून वाहनारा एक पुल पार केला.
हेही वाचा-स्वामी चिन्मयानंद यांच्या दिव्य धाम आश्रमाला टाळे!
पावसातच मुले येथील शासकीय हायस्कूलमध्ये पोचली होती. परंतु, नंतर मुसळधार पावसाने हळूहळू शाळेतही पाणी शिरले. पाण्याने संपूर्ण शाळा भरुन गेली. मुसळधार पावसामुळे शाळेच्या आत पाणी शिरल्याने मुलांना उभे राहण्यास ही जागा राहिली नाही. त्यामुळे शालेय कर्मचाऱ्यांनी या मुलांना एक-एक करुन रांगेत उभे करुन, एकमेकांना धरुन येथील ओसांडून वाहनारा एक पुल पार केला. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही. मात्र, हा सगळा प्रकार कॅमेर्यात कैद झाला आहे. त्यामुळे शाळकरी मुलांचा शालेय कर्मचाऱ्यांनी जिव धोक्यात घातल्याने त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.