महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बापरे..! मगरीने कुत्र्यावर घातली झडप; काळजाचा ठोका चुकवणारा व्हडिओ - एनडीआरएफ जवान

नदीतील मगर चक्क रहिवाशी परिसरात आढळली आहे. या मगरीने कुत्र्यावर झडप घातली मात्र तीच्या तावडीतून कुत्रा थोडक्यात बचावला आहे.

मगरीने कुत्र्यावर घातली झडप; थोडक्यात बचावला कुत्रा, पाहा व्हडिओ

By

Published : Aug 2, 2019, 7:49 PM IST

वडोदरा -गुजरातमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे वडोदरामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भाग पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. याच पाण्यात एक मगर चक्क रहिवाशी परिसरात आढळली आहे. या मगरीने एका कुत्र्यावर झडप घातल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मगरीने कुत्र्यावर घातली झडप; थोडक्यात बचावला कुत्रा


पुराच्या पाण्याबरोबर एक मगर नागरीवस्तीत घुसली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी मोबाईलमध्ये मगरीचा व्हिडीओ कैद केला आहे. वनविभागाकडून मगरीला पकडण्यात आले आहे.

नविभागाकडून मगरीला पकडण्यात आले आहे.


पुरामुळे लोकांना रस्ता पार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरतील शाळा-कॉलेज बंद करण्यात आले असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलीस आणि एनडीआरएफ जवान तैनात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details