उन्नाव -उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात असलेल्या एका जेलमधील व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कैद्यांनी हातात बंदूक घेऊन फिल्मी अंदाजात मुख्यमंत्री अदित्यनाथ यांना आव्हान दिले आहे.
बंदूक हातात घेऊन कैद्यांचे तुरुंगातच व्हिडिओ शूटींग, फिल्मी अंदाजात योगी सरकारला दिले आव्हान - uttar paradesh
उन्नाव जिल्ह्यातील जेलमधील एक व्हिडोओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कैद्यांनी हातात बंदूक घेऊन फिल्मी अंदाजात मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना आव्हान केले आहे.
या व्हिडिओमध्ये कैद्यांनी जेलमध्ये गांजा आणि अफू उपल्बध असल्याचा दावा केला आहे. याचबरोबर त्यांना बाहेरचे जेवन आणि इतर वस्तूही मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच त्याने शायरी म्हणत योगींना आव्हान दिले आहे.
तुरुंगातील कैदी अमरेश याला 31 मार्च 2017 रोजी मेरठ येथील जेलमधून उन्नव येथे पाठवण्यात आले होते. तो भा. द. वी. कलम 302 नुसार जन्मठेमेची शिक्षा भोगत आहे. या शिवाय दुसरा आरोपी देवैंद्र प्रताप गौरव याला 11 फेब्रुवरी 2017 रोजी लखनऊ येथून उन्नाव येथे पाठवण्यात आले होते. देवैंद्रदेखील भा. द. वी. कलम 302 नुसार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या तुरुंगात गांजा आणि अफु कसे आले? यासंदर्भात पोलीसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही.