महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली अग्नीतांडव प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रँच करणार

राजधानी दिल्लीतील झाशी रोड येथे धान्य मंडईला लागलेल्या आगीत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ५० पेक्षा जण जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून या आगीचा तपास गुन्हे विभागाकडे (क्राईम ब्रँच) देण्यात येणार आहे.

दिल्ली आग
मनदीप सिंह रंधावा

By

Published : Dec 8, 2019, 5:00 PM IST

दिल्ली - राजधानी दिल्लीतील झाशी रोड येथे धान्य मंडईला लागलेल्या आगीत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ५० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून या आगीचा तपास गुन्हे विभागाकडे (क्राईम ब्रँच) देण्यात येणार आहे. बचावकार्य पूर्ण झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिल्ली अग्नीतांडव प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रँच करणार
सकाळी ५. २२ च्या दरम्यान आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली होती. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू झाले. ७ च्या दरम्यान जखमींना बाहेर काढण्यात आले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या सखोल चौकशीनंतर आगीचे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस उपअधीक्षक मनदीप सिंह रंधावा यांनी सांगितले. आगीमध्ये एकून ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. इमारतीच्या मालकाचा शोध सुरू असल्याचे रंधावा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details