नवी दिल्ली - निझामुद्दीन येथील मरकझप्रकरणी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा टीम ही निझामुद्दीन येथे चौकशीसाठी पोहोचली आहे. १ एप्रिलला या मरकझमधून जवळपास २३०० नागरिकांना काढण्यात आले होते. तर, तबलिगी जमातचे मुख्य असलेले मौलाना साद आणि इतर लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निझामुद्दीन मरकझ प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे - मरकझ अभियान निझामुद्दीन दिल्ली
निझामिद्दीन येथील मरकझ प्रकरणी दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच टीम ही निझामुद्दीन येथे पोहोचली आहे. तबलिगी जमातच्या 'मरकझ'मध्ये उपस्थित असलेल्यांपैकी अनेकजण हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून याचा तपास हा आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
![निझामुद्दीन मरकझ प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे निझामुद्दीन मरकझ प्रकरण आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6669771-1066-6669771-1586074520526.jpg)
गुन्हे शाखेचे अधिकारी हे मरकझ प्रकरणाच्या चौकशीसाठी निझामुद्दीनला पोहोचले आहेत. ही टीम मरकझमध्ये जाऊन आतील महत्वपूर्ण तपास आणि माहिती गोळा करणार आहेत. या तपासादरम्यान गुन्हे शाखेने कोरोनापासून संरक्षणाकरता खास तयार केलेले कपडे घातले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निझामुद्दीन मरकझ येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर 'मरकझ अभियान' चालवून थांबवण्यात आले होते. मरकझमध्ये उपस्थित असलेल्या २३०० हुन अधिक नागरिकांना तेथून रुग्णालय आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. तर, याठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनादेखील खबरदारी म्हणून तपासणीकरता पाठवण्यात आले आहे.