नवी दिल्ली - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांची हत्या त्यांची पत्नी अपुर्वा यांनी केल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणी क्राईम ब्रांचने अपुर्वा यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
रोहित तिवारी हत्याकांड ; पत्नी अपुर्वाविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल
क्राईम ब्रांचने अपुर्वा यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
रोहीत तिवारी हत्याकांड - पत्नी अपुर्वाविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल
रोहित यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी पत्नी अपूर्वा शुक्लाला एप्रिल महिन्यात अटक केली होती. पोलिसांनी अपुर्वाला फैलावर घेतल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली होती. याप्रकरणी आज न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
लग्नापासूनच दोघांमध्ये भांडणे होत होती. रोहीतच्या दारूच्या व्यसनामुळे तिने खून केल्याचे तपासात समोर आले आहे. रोहित यांचा गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले होते.