नवी दिल्ली आणि माले यांनी नवीन राजनैतिक क्रीडा भूमी स्वीकारली आहे, ती म्हणजे, क्रिकेटची खेळपट्टी. मालदीवच्या बेटावर क्रिकेट इको सिस्टीम विकसित करण्याचा एक भाग म्हणून, भारत लवकरच मालदीवच्या राष्ट्रीय संघाना चेन्नईमध्ये प्रशिक्षण देणार आहे. मालेतील भारतीय दूतावसाने एक औपचारिक निवेदन जारी केले असून त्यात मालदीवचे पुरुष आणि महिला संघ पुढील महिन्यात चेन्नईला प्रवास करून येतील आणि एक महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे त्यात म्हटले आहे.
14 नोव्हेंबरला मालदीवन प्रशिक्षकांसाठी आठवड्याचा स्तर दोन प्रशिक्षण अभ्यासक्रम समाप्त झाला. गेल्या आठवड्यातील प्रशिक्षणानंतर, 19 ते 26 नोव्हेंबर या दरम्यान बीसीसीआयचे दोन पंच शवीर तारापोर यांच्या नेतृत्वाखाली स्तर दोन पंच प्रशिक्षण अभ्यासक्रम घेतील. तारापोर हे आयसीसीच्या (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) पंच पॅनलमध्ये असून ते आपल्या मुक्कामात 23 स्थानिक मालदीवन पंचाना प्रशिक्षित करतील.
यावर्षी मार्चमध्ये दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या माले भेटीत, मालेने भारतीय सरकारकडे आपल्या देशात एक क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी मदत करण्याची आश्चर्यकारक विनंती केली. यंदाच्या जूनमध्ये, लोकसभा निवडणुकीतील जोरदार यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव भेटी अगोदर दिल्लीने विनंती मान्य केली, ज्यामुळे डावपेचात्मक दृष्टीने वसलेल्या या द्वीपसमूह राष्ट्रातील लोकांशी भारतीयांचा अधिक खोलवर संपर्क होण्यास मार्ग मोकळा होणार आहे. 8 जूनच्या आपल्या अधिकृत भेटीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या जेव्हा इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेसाठी असताना सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली बॅट मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोली याना भेट दिली होती.