महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Coronavirus : दारूची दुकाने उघडा! आमदार साहेबांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र - कोरोना विषाणू

पूनिया यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, कोविड - 19 मुळे संपूर्ण राज्यात दारूची विक्री बंद आहे. त्यामुळे अवैध दारूचा व्यवसाय वाढत आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्यही खालावत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या महसूलालाही त्रास होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने नियमात शिथिलता करुन पुन्हा दारूची विक्री सुरू करावी.

open liquor shops in lockdown
माकप आमदार

By

Published : Apr 8, 2020, 12:59 PM IST

जयपूर- हनुमानगडमधील नोहर येथील कम्युनिस्ट आमदार बलवान पूनिया यांनी लॉकडाऊनदरम्यान बंद असलेली दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनमध्ये अवैध दारूविक्रेते चढ्या दराने दारू विकत असल्याचे पूनिया यांनी सांगितले.

माकप आमदाराची मुख्यमंत्री गहलोत यांच्याकडे दारूची दुकाने उघडण्याची मागणी

पूनिया यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, कोविड - 19 मुळे संपूर्ण राज्यात दारूची विक्री बंद आहे. त्यामुळे अवैध दारूचा व्यवसाय वाढत आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्यही खालावत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या महसूलालाही त्रास होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने नियमात शिथिलता करुन पुन्हा दारूची विक्री सुरू करावी, अशी मागणी पूनिया यांनी केली आहे.

  • सोशल डिस्टंन्स ठेवून करावी दारु विक्री -

कोरोना महामारीचे संकट सुरू आहे, अशा परिस्थितीत दारू दुकानात सामाजिक अंतरांची काळजी घेतल्यानंतरच विक्री करावी. यासाठी रेशन दुकानांच्या दुकानांमध्ये व्यवस्था आहे, तशीच दारूच्या दुकानात व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी आमदार बलवान पूनिया यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details