महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दूरदर्शन बनलेय 'मोदी भजन केंद्र', भाकपचा आरोप - allegation

'दूरदर्शन 'मोदी भजन' चॅनल बनले आहे. भाजप आणि आरएसएसच्या हिंदू विचारधारेविरोधात जे काही बोलले जाते, ते दूरदर्शन सहन करू शकत नाही,' असे नारायण यांनी म्हटले आहे. ते सध्या बेगुसराय येथे भाकप उमेदवार कन्हैया कुमारसाठी प्रचार करत आहेत.

भाकप नेते के. नारायण

By

Published : Apr 20, 2019, 10:11 AM IST

नवी दिल्ली - भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दूरदर्शनने भाकपच्या एका नेत्याला भाजप आणि आरएसएसविरोधात भाषण करण्यापासून अडवल्याचा आरोप केला आहे. 'ईटीव्ही भारत'शी केलेल्या चर्चेत त्यांनी हा आरोप केला. भाकपचे राष्ट्रीय सचिव के. नारायण यांनी दूरदर्शन 'मोदी भजन केंद्र' बनले असल्याचा आरोप केला आहे.


'दूरदर्शन 'मोदी भजन' चॅनल बनले आहे. भाजप आणि आरएसएसच्या हिंदू विचारधारेविरोधात जे काही बोलले जाते, ते दूरदर्शन सहन करू शकत नाही. दूरदर्शनच्या स्क्रिप्ट वेट्टिंग कमिटीने केरळचे माजी मंत्री बिनॉय विश्वम यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनामुळे एक परिच्छेद काढून टाकण्यास सांगितले होते,' असे नारायण यांनी म्हटले आहे. ते सध्या बेगुसराय येथे भाकप उमेदवार कन्हैया कुमारसाठी प्रचार करत आहेत.


'मागील काही वर्षांत भारतीय रिझर्व्ह बँक, प्रसार भारती आणि निवडणूक आयोग आदी संवैधानिक संस्था मोदींच्या बाजूने कार्य करत आहेत. हे योग्य नाही,' हे आम्ही वारंवार सांगत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details