महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी हे कसे 'देशभक्त', आम्ही सत्तेत असतो तर १५ मिनिटात चीनला हकललं असतं - राहुल गांधींचा हल्लाबोल

चिनी अतिक्रमणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. कृषी कायद्याविरोधात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली आज हरयाणात आली आहे. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

rahul gandhi
राहुल गांधी

By

Published : Oct 6, 2020, 9:57 PM IST

Updated : Oct 6, 2020, 10:57 PM IST

नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलन पुकारले आहे. आज (मंगळवार) राहुल गांधी यांची ट्रॅक्टर रॅली पंजाबातून हरयाणात आली आहे. यावेळी आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'कायर मोदी स्वत:ला देशभक्त समजतात', असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

'आपली जमीन कोणीही बळकावली नाही, असे कायर मोदी म्हणतात. जगात भारत एकमात्र असा देश आहे, ज्याची भूमी दुसऱ्या देशाने बळकावली आहे. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी स्वत:ला देशभक्त म्हणतात. जर आम्ही सत्तेत असतो तर चीनला १५ मिनीटात भारताच्या भूमीवरून पिटाळून लावले असते', असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पंजाबमध्ये 'खेती बचाओ' यात्रा पूर्ण करून हरयाणात पोहचले आहेत. काही वेळ हरयाणा पोलिसांनी त्यांना सीमेवर रोखले होते. मात्र, नंतर राज्यात प्रवेश दिला. केंद्र सरकारचे तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पंजाबमधील लुधियानातील नूरपूर जिल्ह्यात राहुल गांधी यांनी ट्रॅक्टर चालवला. त्यांच्याबरोबर ट्रॅक्टरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड आणि महासचिव हरीश रावत होते. याआधी राहुल गांधी यांनी पटियालामध्ये रॅली केली. यावेळी ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ हजार कोटी रुपये देऊन दोन विमाने खरेदी केली आहेत. तर, दुसरीकडे चीन भारताच्या सीमेवर आला असून आपले जवान कडाक्याच्या थंडीत सीमेचे रक्षण करत आहेत".

आंदोलनादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, कृषी कायद्याद्वारे शेती क्षेत्राला नष्ट करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे पंजाबला सर्वात जास्त नुकसान पोहचेल. खुद्द पंतप्रधानांना हे कायदे समजले नाहीत, असे ते म्हणाले.

Last Updated : Oct 6, 2020, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details