महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO:  कुत्रा पितो गायीचं दूध ! दृश्य पाहून मालकाला बसला आश्चर्याचा धक्का - गायीचं दुध

ही घटना जिल्ह्यातील बैदराहल्ली गावामध्ये घडली. शनिवारी एक कुत्रा गाईचं दूध पीत असल्याचं गावातील एका तरुणाने पाहिलं. त्यानंतर गावकऱ्यांनी गाय मालकाला याबाबतची माहिती दिली.

कुत्रा पीतो गाईचे दुध

By

Published : Jul 28, 2019, 1:22 PM IST

बंगळुरू-कर्नाटकातील हसन जिल्ह्यात एक भटका कुत्रा गायीचं दूध पितानाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कुत्रा दूध पीत असल्यांच समजल्यावर गाय मालकाला तर धक्काच बसला. मागील पंधरा दिवसांपासून गाय कमी दूध देत असल्याचं मालकाच्याही लक्षात आले होतं. मात्र दूध कमी होण्यामागचं कारण त्यांना समजत नव्हते. आता भटका कुत्राच गायीचे दूध पित असल्याचे समजल्याने दूध कमी का निघते याचा उलगडा झाला आहे.

कुत्रा पीतो गाईचे दुध

ही घटना जिल्ह्यातील बैदराहल्ली गावामध्ये घडली. शनिवारी एक कुत्रा गाईचं दूध पीत असल्याचं गावातील एका तरुणाने पाहिले. त्यानंतर गावकऱ्यांनी गाय मालकाला याबाबतची माहिती दिली. घरासमोरच एक कुत्रा आपल्या गाईचं दूध पीत असल्याचे पाहून मालकालाही आश्चर्याचा धक्काच बसला.

कुत्रा गाईचं दूध पीत असतानाचा व्हिडिओ एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये काढल. त्यानंतर त्याने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केला. कुत्रा आणि गाईचा हा व्हिडिओ सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details