बंगळुरू - कर्नाटकच्या मंगळुरूमधील एका आजीबाईंनी कोरोनाशी लढा जिंकला आहे. यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या आजी सौदी अरेबियाहून केरळच्या कोळीकोडला आल्या होत्या. त्यानंतर खोकल्याचा त्रास होतो म्हणून त्यांना २० मार्चला मंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तपासणी केली असता त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर वेनलॉक रुग्णालयातील विशेष कक्षामध्ये त्यांना नेण्यात आले होते. उपचारांनंतर जेव्हा त्यांच्या दोन्ही स्वॅब चाचण्या निगेटिव्ह आल्या, तेव्हा त्यांना रुग्णालयातून डिस्टार्ज देण्यात आला.
दरम्यान, दक्षिण कोरोना जिल्ह्यातील कोरोनाच्या १२ रुग्णांपैकी ७ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तर, उरलेल्या ५ जणांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशवासीयांना करणार संबोधित