नवी दिल्ली -कोरोना विषाणू रुग्णांची संख्या देशामध्ये वाढत चालली असून देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 हजार पेक्षा अधिक झाली आहे. संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढा देत आहे. कोरोना विषाणू जसे एक मोठे आव्हान आहे, तसेच त्यातून एक संधींही निर्माण झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
'कोरोना विषाणू ही एक मोठ्या आव्हानासह असलेली एक संधी' - 'कोरोना विषाणू
कोरोना विषाणू जसे एक मोठे आव्हान आहे, तसेच त्यातून एक संधींही निर्माण झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
'कोरोना सारखी जागतिक महामारी हे एक मोठे आव्हान आहे. परंतु ही एक संधी सुद्धा आहे. संकटाच्या वेळी आवश्यक असलेल्या नाविन्यपूर्ण उपायांवर काम करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक, अभियंता आणि डेटा तज्ज्ञांचा मोठा समूह एकत्रित करण्याची गरज आहे', असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकमेव उपाय नाही. लॉकडाऊन निघाल्यानंतर कोरोनाचे प्रमाण आणखी पुन्हा वाढेल. म्हणून त्याला नियंत्रित करण्यापेक्षा त्याच्यासोबत खंबीरपणे लढायला हवे, असे मत मांडले होते. तसेच देश सध्या मोठ्या संकटातून जात आहे. कोरोनाविरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले होते.