महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरात कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर 39.62 टक्के

भारतामधील कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णाचा दर 39.62 टक्के झाला आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

Health Ministry
Health Ministry

By

Published : May 21, 2020, 9:30 AM IST

नवी दिल्ली - भारतामधील कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर वाढला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 39.62 टक्के झाला आहे. तसेच 1 लाख लोकसंख्येमागे जगभरात 62.3 करोना रुग्ण आढळले असून अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

देशात पहिल्यांदा लॉकडाऊन लागू केल्यानंतर 7.1 तर दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान 11.42 एवढा होता. तिसरे लॉकडाऊन सुरू असताना हाच दर वाढून 26.59 झाला होता. आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये हा दर 39.62 एवढा झाल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

देशातील लाख लोकसंख्येमागे कोरोनाबाधितांचे 7.9 तर मृत्यूचे प्रमाण 0.2 आहे. तर जगभरामध्ये हे प्रमाण सरासरी 4.2 आहे. 0.45 रुग्ण कृत्रिम श्वासोच्छसावर ठेवण्यात आले असून ३ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, ही माहितीही अग्रवाल यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details