नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बिहारमधील निवडणुका थांबवता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आज बिहार विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याची याचिकेवर सुनावणी केली.
निवडणूक आयोगाच्या प्रकियेत दखल देता येणार नाही. जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केल्या जात नाहीत. तोपर्यंत न्यायालयाकडून यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. निवडणूका पुढे ढकलण्यासाठी कोरोना हे वैध कारण नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांना काय करावे हे, न्यायालय सांगू शकत नाही. निवडणूक आयोग संपूर्ण परिस्थितीची सुयोग्यरित्या हाताळले, असे न्यायालयाने म्हटलं आहे.