उत्तरकाशी(उत्तराखंड) - जनपदच्या चिन्यालीसौड ब्लॉकमध्ये 47 लोकांविरोधात क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या कोविड अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबीत केले आहे. कोविड अधिकारी गिरीश सिंह राणाने याप्रकरणात तीन निरपराध व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला होता. कोविड अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी न जाता गावच्या सरपंचाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर जिल्हाधिकारी आशिष चौहान यांनी अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले.
दोन लहान मुलांवर गुन्हा दाखल केल्याने कोरोना अधिकाऱ्याचे निलंबन - covid magistrate suspended in uttarkashi
विड अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी न जाता गावच्या सरपंचाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर जिल्हाधिकारी आशिष चौहान यांनी अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले.
![दोन लहान मुलांवर गुन्हा दाखल केल्याने कोरोना अधिकाऱ्याचे निलंबन covid-magistrate](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6923793-975-6923793-1587736287459.jpg)
होम क्वारंटाईनच्या नियमांचे योग्य पालन करवून घेण्यासाठी चिन्यालीसौड ब्लॉकमध्ये वेगवेगळे कोरोना अधिकारी नेमण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी चिन्यालीसौड ब्लॉकचे अधिकाऱ्याने एक अहवाल महसूल विभागाला पाठवला. या अहवालात माड खालसी गावात 47 जणांनी क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याचे नमूद केले होते. महसूल विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पंचकुला हरयाणातून आई-वडिलांसोबत घरी परतलेल्या 3 वर्षाची मुलगी आणि सहा महिन्याच्या बाळावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाला गांभीर्यपूर्वक घेत जिल्हाधिकारी डॉ. आशिष चौहान यांनी चौकशी केली. चौकशीअंती कोरोना अधिकाऱ्यांने सरपंचाने दिलेल्या माहितीच्या आधारे अहवाल बनविल्याचे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना अधिकाऱ्याचे निलंबन केले आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.