महाराष्ट्र

maharashtra

केरळात एका विद्यार्थिनीसाठी जलपरिवहन विभागाने चालवली ७० सीटर बोट

By

Published : Jun 1, 2020, 7:04 PM IST

केरळ राज्य जल परिवहन विभागाने ७० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट केवळ एका विद्यार्थिनीसाठी चालवली. या विद्यार्थिनीचा ११ वीचा पेपर असल्याने जल परिवहन विभागाने हा निर्णय घेतला.

keral
केरळात एका विद्यार्थिनीसाठी जलपरिवहन विभागाने चालवली ७० सीटर बोट

अलाप्पुझा(केरळ) - येथे केरळ राज्य जल परिवहन विभागाने ७० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट केवळ एका विद्यार्थिनीसाठी चालवली. या विद्यार्थिनीचा ११ वीचा पेपर असल्याने जल परिवहन विभागाने हा निर्णय घेतला. सॅन्ड्रा बाबू असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

ही विद्यार्थिनी अलाप्पुझा जिल्ह्यातील कुट्टनाड भागातील एका बेटावर राहते. तिला शुक्रवार आणि शनिवारी कोट्टायम जिल्ह्यातील कांजीरामीन येथे परीक्षेला जायचे होते. कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती सामान्य झाल्याने परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करून परीक्षा घेतल्या जात आहेत. या भागात फक्त बोटीनेच वाहतूक करता येत असल्याने जलविभागाने या मुलीला सोडण्यासाठी बोटीची व्यवस्था केली.

कुट्टनाड हा भारतातील सर्वात कमी उंचीचा प्रदेश आहे. याठिकाणी समुद्र सपाटीपासून सुमारे 1.2 मीटर ते 3.0 मीटर खाली शेती केली जाते. सॅन्ड्राचे आईवडील मोलमजुरी करणारे आहेत. ती परिक्षेला कशी जाणार याची तिच्या कुटुंबीयांना चिंता सतावत होती. त्यांनी जल परिवहन विभागाशी संपर्क साधला. सॅन्ड्राबद्दल माहिती मिळाल्यानंतर एकटीसाठी आम्ही बोट सोडण्याचा निर्णय घेतला, असे विभागाचे संचालक शाजी नायर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details