नवी दिल्ली -भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात 29 हजार 429 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज सकाळपर्यंत देशातील रुग्णसंख्या 9, 36, 181वर पोहोचली आहे. आतापर्यंत 24, 309 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार देशामध्ये 3, 19, 840 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 92 हजार 32 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 10 हजार 695 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 67 हजार 665वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 7 हजार 963 केसेस ॲक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 49 हजार 7 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 15 हजार 346वर पोहोचली आहे. तर दिल्लीत आतापर्यंत 3 हजार 446 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1 लाख 15 हजार 346 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
गुजरात राज्यात 43 हजार 637 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 47 हजार 324 कोरोनाबाधित तर 2 हजार 99 जणांचा बळी गेला आहे.