नवी दिल्ली -राजस्थानच्या बाडमेरमधील कोविड केअर सेंटरमध्ये बहरलेल्या मैत्रीचे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुंदर नात्यात रूपांतर झाले आहे. वेगवेगळ्या धर्मांतील बाडमेरमधील दोन कुटुंबांनी रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर अतूट नाते जोडले आहे. हिंदू कुटुंबातील मुलीने मुस्लिम कुटंबातील मुलाला राखी बांधली आहे.
हिंदू महिला वर्षा चौहान आणि मुस्लिम महिला निशा शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांतर दोघींनाही कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, जिथे या दोन महिलांची ओळख झाली आणि काहीच दिवसात त्यांचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले. ही मैत्री इतकी वाढली की, रक्षाबंधनाच्या निमित्ताने वर्षांच्या मुलींनी निशाच्या मुलांना राखी बांधली आणि आजीवन संबंध जोडत जातीय ऐक्याचे उदाहरण ठेवले.