महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीतील रेल्वे स्थानकांवर असणार 'रेल्वे कोच कोविड केअर सेंटर'

कोरोना रूग्णांवर देशभरातील रेल्वे कोच कोविड केअर सेंटरमार्फत उपचार केले जाणार आहेत. यासाठी रेल्वे मंत्रालयाने सर्व बंदोबस्त केला आहे. भारतात आजमितीस 5000 रेल्वे कोच कोविड केअर सेंटर तयार आहेत. हे डबे आता वेगवेगळ्या राज्यांतील रेल्वे स्थानकांवर असतील.

Covid Care Center to be deployed at railway stations across the country
दिल्ली रेल्वे स्थानक रेल्वे कोच कोविड केअर सेंटर

By

Published : May 7, 2020, 12:51 PM IST

नवी दिल्ली : अलिकडेच रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार देशभरात 5000 हजार रेल्वे कोच कोविड केअर केंद्रे तयार करण्यात आली आहेत. हे डबे आता वेगवेगळ्या राज्यांतील रेल्वे स्थानकांवर पाठवण्यात येतील. राज्य सरकार कोरोना संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. असेच कोच आता दिल्लीतील रेल्वे स्थानकांवर देखील तैनात करण्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.

दिल्लीतील रेल्वे स्थानकांवर असणार 'रेल्वे कोच कोविड केअर सेंटर'

दिल्लीतील तीन रेल्वे स्थानकांवर असणार कोच...

प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत नवी दिल्ली, जुनी दिल्ली आणि दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकांवर हे कोच लावण्यात येणार आहेत. प्रत्येक स्टेशनवर यासाठी एका नोडल ऑफिसरचीही नेमणूक करण्यात येत आहे.

अशा कोचचा वापर कोरोना संक्रमित किंवा संशयित रूग्णांसाठीच केला जाऊ शकतो.कारण आयसोलेशन वॉर्डची सर्व व्यवस्था येथे केली गेली आहे. मात्र, रुग्णाच्या तब्येतीमध्ये अधिक बिघाड झाल्यास अशा रुग्णांना रुग्णालयात पाठवले जाईल.

हेही वाचा...केंद्रीय गृह सचिव दिल्लीतील नेत्यांना खूश करतायेत, तृणमूल काँग्रेसचा आरोप

प्रत्येक कोचवर एक नोडल ऑफिसर...

उत्तर रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, दिल्लीतील या प्रत्येक स्थानकासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल अश सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details