सुरत - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने अनेक नियोजित कार्यक्रम रद्द झाले आहेत. मात्र, यातच गुजरातमधील सुरत येथे एक जोडपे विवाहबद्ध झाले आहे. अत्यंत साधेपणाने हे लग्न पार पडले आहे.
फक्त 6 वऱ्हाडींच्या उपस्थितीत लॉकडाउनमध्ये लागले लग्न - Gujarat lockdown wedding
गुजरातमधील सुरत येथे एक जोडपे विवाहबद्ध झाले आहे. अत्यंत साधेपणाने हे लग्न पार पडले आहे.
![फक्त 6 वऱ्हाडींच्या उपस्थितीत लॉकडाउनमध्ये लागले लग्न फक्त 6 वऱ्हाडींच्या उपस्थितीत लॉकडाउनमध्ये लागले लग्न](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6824286-351-6824286-1587098858119.jpg)
लॉकडाऊनमुळे या लग्नसोहळ्याला फक्त 6 वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. पुजा असे वधुचे तर दिशांक असे वर मुलाचे नाव आहे. यावेळी दोघेही मास्क घालून लग्नाचा विधी पार पाडला. लग्नाच्या ठिकाणी सर्वांना सॅनिटायझरचा वापर करण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्यास सांगण्यात आले होते. नवरीच्या घरीच हे लग्न पार पडले आहे.
आम्हाला भव्य लग्न करायचे होते. मात्र, कोरोनामुळे आम्ही साधे लग्न करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी व्हिडिओ कॉलद्वारे लग्न सोहळ्यात भाग घेतल्याचे पूजाने सांगितले. तसेच कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वांनी लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे, असे आवाहन या जोडप्याने लोकांना केले.