हैदराबाद - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केलं जात आहे. यावेळी अनेक जण लॉकडाउनच्या काळात घरामध्ये वेळ घालवण्यासाठी कॅरम, बुद्धीबळ, लुडो किंवा उणो सारखे काही घरातील खेळ खेळत आहेत. यावेळी काही जण शेजारील घरातील लोकांना घरी बोलवून गेम्स खेळत आहे. कोरोना संकटात शेजाऱ्यांना सोबत घेऊन गेम खेळेण धोकादायक असून याबाबत तेलंगाणा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
नुकतचं सुर्यापेठ येथील एका महिलेने गेम खेळताना कमीतकमी 31 जणांना विषाणू संक्रमित केला होता. तसेच एका लॉरी चालकानेही पोकर गेम खेळताना अनेकांना विषाणू संक्रमित केला होता. या पार्श्वभूमीवर 4 हून अधिक जणांनी एकत्र येत गेम खेळणाऱयावर तेलंगाणा पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.