महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेलंगाणा सरकार करणार कर्मचाऱ्यांच्या वेतनात 75 टक्क्यांची कपात - तेलंगाणा कोरोना न्यूज

राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेण्यासाठी प्रगती भवन येथे बैठक झाली. कोरोना विषाणुच्या भीतीमुळे राज्याच्या विकासावर विपरित परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, आमदार, राज्याचे सचिव तसेच स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या वेतनात 75 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

के. चंद्रशेखर राव
के. चंद्रशेखर राव

By

Published : Mar 31, 2020, 12:26 PM IST

हैदराबाद (तेलंगाणा) - कोरोना विषाणुचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत तेलंगाणा सरकारने आपल्या कर्मचार्‍यांच्या वेतनात दहा टक्के ते 75 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला.

राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेण्यासाठी प्रगती भवन येथे बैठक झाली. कोरोना विषाणुच्या भीतीमुळे राज्याच्या विकासावर विपरित परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, आमदार, राज्याचे सचिव तसेच स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या वेतनात 75 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर, जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेतनात 60 टक्क्यांची कपात करण्यात येणार. तसेच अन्य केंद्रीय सेवा अधिकाऱ्यांच्या वेतनात 50 टक्क्यांची कपात केली जाणार.

चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचार्‍यांच्या वेतनात 10 टक्के कपात केली जाईल. तर, सर्वच श्रेणीतील निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्ती भत्त्यातून 50 टक्के कपात केली जाईल.

दरम्यान, चतुर्थ श्रेणी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या वेतनात 10 टक्के कपात केली जाईल. तसेच सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील कर्मचारी, शासकीय अनुदान मिळत असलेल्या संस्थांमधील कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातसुद्धा 10 टक्क्यांनी कपात करण्यात येणार.

पगारातील कपात ही किती कालावधीसाठी असेल, तसेच आता कपात होणार असलेली रक्कम या कर्मचाऱ्यांना भविष्यात दिली जाणार की नाही, याबद्दल काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

राज्यात एकूण कोरोनाबाधितांच्या संख्या 71 झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी दिली. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची 1,251 वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details